किनवटमध्ये हिरो शोरुम फोडले – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथील चुंगी नाकाजवळ एक शटर फोडून चोरट्यांनी त्यातून 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
सागर किशनराव ओदीवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 जूनच्या रात्री 8.30 ते 13 जूनच्या सकाळी 9 वाजेदरम्यान एका शोरुमचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील नाण्यांचा साठा, दोन ग्रॅमची लक्ष्मी मातेची मुर्ती, एक सॅमसंग मोबाईल व सीसीटीव्ही डीव्हीआर असा 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. हा शटर हिरो होंडा कंपनीचे आहे. किनवट पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 158/2024 नुसार दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार वाडगुरे हे करीत आहेत.


Post Views: 28






Share this article:
Previous Post: सा.बां.कार्यालयासमोर सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक करणार आत्मदहन

June 14, 2024 - In Uncategorized

Next Post: अत्यंत धुरंधर तपासिक अंमलदार असतांना एक कोटी रुपयांच्या प्रकरणात न्यायालयात पोलीस कोठडी नामंजूर;अनेक ताशेरे ओढत प्रकरणातील आरोपीनां जामीन दिला

June 14, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.