‘काॅंग्रेसला बरोबर घेऊ नये…’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Read Time:1 Minute, 44 Second


सोलापूर | 2024 च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  म्हणाले होते की, 2024 च्या लोकसभा निवडणुका विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात लढतील.

पवार सध्या सोलापूर(Solapur) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, 2024 मध्ये  विरोधी पक्ष एकत्र लढतील का ?, यावर पवार म्हणाले, सगळ्यांनी मिळून काहीतरी करावे अशी सर्वांची इच्छा आहे. पण अजून त्याबाबत कोणतंही नियोजन झालेलं नाही.

तसेच पवार म्हणाले, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि नितीश कुमार(Nitish Kumar) यांनी माझी भेट घेऊन आपली मतं  मांडली आहेत, परंतु अजून कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.

काॅंग्रेसबाबत(Congress) बोलताना पवार म्हणाले, काॅंग्रेसला बरोबर घेऊ नये, असं काहींचं मत आहे. पण कोणी कोणाला सोबत घेऊ नये, अशी भूमिका कोणी घेऊ नये. तसेच काॅंग्रेस यामध्ये अडचण ठरत नाही, असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांच्या जामीनाबाबत मोठी बातमी समोर!

Amazon ची iPhone प्रेमींसाठी भन्नाट ऑफर; जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published.

9 + 10 =