January 25, 2022

काळ्या गव्हाचे फायदे

Read Time:12 Minute, 48 Second

प्रामुख्याने गहू म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पिवळा रंग येतो. मात्र काळ्या रंगाचा गहू असतो, यावर कुणालाच विश्वास बसणार नाही. कारण ही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. पिवळ्या गव्हापेक्षाही काळा गहू आरोग्यासाठी अतिशय पौाष्टिक आहे. भारतामध्ये काळ्या गव्हाचे उत्पादन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, राज्यस्थान मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. महाराष्ट्रात मुख्यत: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काळ्या रंगाच्या गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

काळ्या गव्हाच्या वाणाचे संशोधन मोहाली, पंजाब येथील राष्ट्रीय कृषी खाद्य जैव तंत्रज्ञान संस्था (एनबीआय) या संशोधन केंद्रातील मोनिका गर्गे यांनी केला आहे. मोहालीच्या संशोधनानंतर या काळ्या गव्हाला पेटंट सुध्दा देण्यात आले आहे. या काळ्या गव्हाला नबी एनजी असे नाव देण्यात आले असून ते काळा, निळा आणि जांभळा रंगात उपलब्ध आहे. मोहाली परिसरातील शेतक-यांना हा वाण उपलब्ध करून देण्यात आला आहे. काळा गहू सामान्य गव्हापेक्षा बराच पौष्टीक आहे. कारण या गव्हामध्ये झिंक, मॅग्नेशियम, लोह इत्यादी अन्न द्रव्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरिराची होणारी झीज लवकर भरून येण्यास मदत होते. तसेच प्रथिनाची मात्रा सुध्दा खूप जास्त आहे. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट व अँथोसायनीन घटक असतात. अँथोसायनीन हा गव्हातील अत्यंत महत्वाचा घटक असून याचे सामान्य गव्हात ५ ते १५ पीपी एम इतके प्रमाण असते तर काळ्या गव्हातील अंथोसायनीनचे प्रमाण ४० ते १४० पीपीएम इतके असते.

अँथोसायनीन मध्ये फन्टिकॅन्सर, फन्टिडायबेटीक आणि फन्टिमायक्रोबियल गुणधर्म असतात. विशेष म्हणजे अँथोसायनीन शरीरातून मुक्त रॅडिकल्सचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. महत्वाचे म्हणजे फळे व भाज्यांना निळा किंवा जांभळा रंग हा त्यातील अँथोसायनीन द्रव्यामुळे येतो. या काळ्या गव्हात सुध्दा हे द्रव्य अधिक प्रमाणात असून ते फन्टिऑक्सिडंट आहे. म्हणजेच अ‍ँथोसायनिन द्रव्य रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करणारे आहे. तसेच अँथोसायनीन हा घटक आरोग्याचा दृष्टीने अत्यंत फायद्याचा सुध्दा आहे. काळ्या गव्हाच्या पेरणीचा खर्च सामान्य गव्हापेक्षा कमी आहे. कारण त्यावर कोणताही रोग पडत नसल्याने कुठल्याही रासायनिक फवारणी करण्याची गरज नाही. काळ्या गव्हाच्या जमिनीखालच्या बुंध्याला कोणत्याही प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीमुळे हानी होत नाही.

काळ्या गव्हाचे गुण लक्षात घेतले तर भविष्यात हा काळा गहू खाण्या-यांनाही आणि पिकवणा-यांनाही फायद्याचा असू शकतो. यात कांही शंका नाही. या पौष्टिक काळ्या गव्हाची मागणी वाढून जास्तीत जास्त शेतकरी काळया गव्हाच्या लागवडीकडे वळावेत व शेतक-यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे हीच अपेक्षा.
आपण जे अन्न खातो. त्याचे शरीराला आवश्यक उर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रूपांतर होते. मधुमेह आजारामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलीत होतेकिंवा वाढते. मधुमेह हा एक असा आजार आहे ज्याने भारत आणि जगातील सर्व पुरोगामी देशासह इतर देशात आपले पाय पसरले आहेत. विचित्र बाब म्हणजे बरीच महागडी औषधी असूनही त्याचा कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाही. मात्र काळ्या गव्हाची चपाती (रोटी) नियमितपणे खाल्ल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य राहून मधुमेह नियंत्रीत राहतो. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यामध्ये तणाव निर्माण होतो. सामान्यत: रक्तदाब १२०/८० असतो त्याहून जास्त आणि १३९/८९ पर्यंतचा पूर्व उच्च रक्तदाब आणि १४०/९० पेक्षा अधिकचा उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो. ब-याच वेळा मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढतो व त्यामुळे घाम येऊन चक्कर येते.

त्यासाठी काळा गहू अत्यंत गुणकारी आहे. काळ्या गव्हाची चपाती/रोटी रक्दाबाचा त्रास असलेल्या रूग्णांनी दररोज तरी खावी ज्यामळे त्यांचा रक्तदाब वाढत नाही. व या आजारापासून आराम मिळतो. कोलेस्टेरॉल हा प्राण्याच्या पेशीमध्ये आढळणारा एक चरबीसारखा पण रासायनिक घटक आहे. जो अनेक महत्वपूर्ण शारिरीक क्रियेसाठी अत्यंत आवश्यक असतो बदलत्या जीवनशैली आणि खाण्याच्या बदलत्या सवयीमुळे सध्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी काळा गहू अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे काळ्या गव्हाची चपाती/रोटी दररोज एक वेळा खाल्याने त्यांच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ लागले आणि चांगल्या बोलेगॉनची पातळी वाढ लागते. कर्करोग हा शरीरातील पेशीच्या नियंत्रीत वाढीमुळे उद्भवणारा गारमा कोणत्याही पेशीमध्ये. कोणत्याही उतीमध्ये आणि कोणत्याही अवयवामध्ये होऊ शकतो. कर्करोग हा सध्यातरी असा आजार आहे ज्यासाठी अटाप कायमचे उपचार उपलब्ध नाही.

काळ्या गव्हामध्ये कर्करोगास प्रतिबंध करण्याचे गुणधर्म आढळून आले आहेत. या चपाती/रोटीचे सेवन केल्यास काही प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होते. मलावरोध किंवा बटो खाण्याच्या सवयीमुळे सर्व वयोगटातील लोकांसाठी एक सामान्य समस्या झाली आहे. प्रामुख्याने पुरेशा तंतूमय पदार्थानी आणि दिवसभरात पुरेसे पाणी न पिणे यामुळे बध्दकोष्ठता निर्माण होते. ज्यामध्ये मलनिस्सारण कठीण होते आणि ते कमी वारंवारतेने होते. बध्दकोष्ठता हा आजार नसून अपु-या पचनक्रियेमुळे मोठ्या आतडयातील जमलेला मल नैसर्गीकरित्या बाहेर पडणा-या बाहेर पडणा-या प्रक्रियेची कार्यक्षमता कमी होते. त्यासाठी काळ्या गव्हाची चपाती/रोटी पाचक प्रणालीसाठी फायदेशीर मानली जाते. आतड्याचे संक्रमण हा आज असणारा आहे. ब-याच वेळा पचन संस्थेला जंतूसंसर्ग होतो. ज्यामुळे आतड्यामध्ये दाह होतो. आपल्या पचनसंस्थेमा अन्ननलिकेपासून शेवटपर्यंत स्रायुंच्या आकुंचन व प्रसारणामुळे पुढे-पुढे सरकते यासाठी तंतुमय पदार्थची आवश्यकता असते.

काळ्या गव्हामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे मलनिस्सारण व्यवस्थित होते म्हणून आपल्या आहारामध्ये काळ्या गव्हाची चपाती/रोटीचा नियमितपणे समावेश केल्यास लाभदायक होते. शरीरात गरजेपेक्षा जास्त मेद साठवूण होणे यालाच लठ्ठपणा असे म्हणतात. यामध्ये शरिरातील उतीमध्ये अतिरिक्त प्रमाणात चरबी जमा होऊन आवश्यक वजनापेक्षा २० टक्के अधिक वजन वाढते आणि त्यामुळे अनेक आजारांच्या समस्या निर्माण होतात. त्यासाठी काळा गहू वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काळ्या गव्हाची चपाटी रोटी खाल्ल्यास पोट लवकर भरते व भूक कमी लागते. काळ्या गव्हाचे सेवन केल्याने हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. कारण या काळ्या गव्हामध्ये ट्रायग्लिसराईड घटक असतात. त्याशिवाय यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण सुध्दा जास्त असते ज्यामुळे शरिरातील कोलेस्टेरॉलचा स्तर नियंत्रीत राहण्यास मदत होते तसेच काळ्या गव्हाच्या चपाती/रोटी मध्ये असंतृप्त स्रिग्धाम्ले (फॅटी-
अ‍ॅसीड) आढळतात जे हृदय निरोगी राहण्यास मदत करतात. आजच्या आधुनीक काळात जवळ-जवळ प्रत्येक माणूस कमी-जास्त का प्रमाणात होईना पण तणाव ग्रस्त आहे हा तणाव कमी होण्यासाठी त्याला दररोज नवीन औषधीचे सेवन करावे लागते.

व हळूहळू औषधाशिवाय जगू शकत नाही. यासाठी काळ्या गव्हाचे सेवन एक आशेचा किरण आहे. काळ्या गव्हाच्या चपाती/रोटीच्या सेवनाने मुक्त रॅडिकल्सचे प्रमाण कमी होते ज्यामुळे ताण-तणाव कमी होण्यास लाभदायक होते. गव्हामध्ये अनेक पौष्टिक घटकांपैकी फॉस्फरस सुद्धा असतो. ज्यामुळे पेशीचे नवनिर्मिती शक्त होते. काळया गव्हाचे सेवन केल्यास शरीरात नवीन पेशी तयार करणे आणि त्याची देखभाल करणे सोईचे होते. काळ्या गव्हामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम शिवाय लोहाचे प्रमाण सुध्दा मुबलक असते. त्यामुळे काळ्या गव्हाच्या चपाती/रोटी चे सेवन नियमित व दररोज केल्यास शरीरात रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते व त्याचबरोबर शरीरात ऑक्सिजनची पातळी योग्य राहते. त्यामुळे रक्ताची वाढ होऊन अशक्तपणा कमी होण्यास फायदा होतो. विशेष म्हणजे यामध्ये मँगनीज मोठ्या प्रमाणात आढळतात जे निरोगी चयापचाय, शारीरीक व बौध्दिक वाढ आणि शरीराच्या अँटीऑक्सिडंट प्रतिरक्षासाठी आवश्यक भूमिका निभवतात. त्यासाठी प्रत्येकाने काळ्या गव्हाचा समावेश आपल्या आहारात करावा.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − 14 =

Close