कालच्या हिट ऍन्ड रन प्रकरणात वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल नाही


नांदेड(प्रतिनिधी)- काल रात्री घडलेल्या हिड ऍन्ड रन प्रकरणात बातम्या छापून आल्या. त्या ठिकाणी दुसरा प्रकार घडला. त्या ठिकाणी काही जणांनी गर्दीचे व्हिडीओ केले. पण आता दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7 वाजे पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक आवाज गुंजतो आहे आणि तो आवाज हम भी बडे गुंडे है। असा आहे. योगेश्र्वरांनी तो मोठा गुंडा कोण आहे हे शोधावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
काल रात्री 9 वाजेच्यासुमारास आयटीआय चौकामध्ये चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.23 बी.एच.5190 ने दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 सी.एम.2035 ला धडक दिली आणि चार चाकी वाहन न थांबता पुढे निघून गेले. सुदैवाने दुचाकीवरील स्वारांना काही इजा झाली नव्हती. म्हणून त्यांनी त्या चार चाकी गाडीचा पाठलाग केला. हा पाठलाग भाग्यनगरच्या कमानीजवळ संपला. त्या ठिकाणी दुचाकी स्वारांनी चार चाकी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला असतांना पुन्हा त्या दुचाकीला चार चाकी गाडीने धडक दिली. एवढेच नव्हे तर दुचाकीचे स्वार बाजूला झाल्यानंतर चार चाकी गाडीने दुचाकी फरफटत पुढे नेली. घटना झाली त्या ठिकाणच्या आसपासमध्ये असंख्य शिकवण्या आहेत. शिकवण्या नुकत्याच सुटल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावर विद्यार्थ्यांची गर्दी होती. दोन गाड्यांच्या स्वारांमध्ये वाद सुरू झाला आणि बघ्यांची हजारोंची गर्दी जमली.
झालेला प्रकार पोलीसांना समजला. पोलीस पण तेथे आले. त्यातील एकाला पोलीसांनी आपल्या ताब्यात घेवून पोलीस वाहनात बसविले. तेंव्हा त्या ठिकाणी झालेल्या गोंधळाचा कोणी तरी व्हिडीओ तयार केला आणि तो व्हायरल झाला. त्यानंतर तो व्हिडीओ वास्तव न्युज लाईव्हकडे पोहचला. त्या व्हिडीओमध्ये एक आवाज गुंजतो आहे. की हम भी बडे गुंडे है। पोलीसांसमोर गुंजणारा हा आवाज नांदेडच्या नागरीकांसाठी दु:खदायी आहे. आज संध्याकाळी बातमी लिहिपर्यंत तरी अपघात प्रकरणात कोणी तक्रार द्यायलाच आले नाही. असे पोलीस सुत्रांनी सांगितले.अपघाताचा गुन्हा दाखल होईल, न होईल प्रश्न हा नाही. कारण त्या अपघातात कोणाचा जिव गेला नाही, कोणाला दु:खापतही झालेली नाही. पण हजारो लोकांच्या समोर हम भी बडे गुंडे है। असे म्हणाऱ्याचा उपचार होणे आवश्यक आहे. योगेश्र्वरांनी त्या गुंडाकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हजारोंच्या संख्येत लोकांनी हा अपघाताचा घटनाक्रम पाहिला त्यात 90 टक्के संख्या विद्यार्थ्यांची आहे. आता जो गुंड मी मोठा गुंड आहे असे पोलीस आणि जनतेसमोर सांगत आहे ते ऐकणारे विद्यार्थी मात्र त्याला भितीलच आणि या कालच्या घटनेनंतर बाहेरगावहून आलेल्या 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना या धमकीवर लुटणे त्या गुंडाला सहज शक्य होईल. विद्यार्थ्यांना लुटण्याचे प्रकार त्या भागात अनेक गुंड करतात. त्यांच्या कधी तक्रारी पोलीसांपर्यंत आल्या नाहीत. मग या गुंडाची तक्रार पण येणार नाही असे बोलले जात आहे. पण योगेश्र्वराने आपल्या जीवनात अनेक दैत्यांचा संहार करून समाजाला मुक्त केले होते. आजही असेच घडावे अशी अपेक्षा.
संबंधीत व्हिडीओ….


Post Views: 145


Share this article:
Previous Post: महिलेच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र तोडले

June 16, 2024 - In Uncategorized

Next Post: 19-20 वर्षीय युवतीचा संशयास्पद मृत्यू – VastavNEWSLive.com

June 16, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.