July 1, 2022

कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

Read Time:2 Minute, 38 Second

अपराजित सर्वगोड / पंढरपूर :

भूवैकुंठ पंढरीनगरीत श्री विठ्ठलाच्या कर्तिकी यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.मात्र एसटीचा संप आणि तिस-या लाटेच्या शक्यतेमुळे वीस महिन्यांनंतर होणा-या या यात्रेत भाविकांची संख्या मात्र घटली असली तरी विठ्ठल भक्तांचा उत्साह दिसून येत होता. कार्तिकी एकादशीनिमित्त प्रदक्षिणा मार्ग विठू नामाच्या गजराने पुन्हा एकदा दुमदुमून गेला असल्याचे पाहावयास मिळाले.

भूवैकुंठ पंढरीनगरीतील कार्तिकी वारी सोहळा तब्बल वीस महिन्यांनंतर भाविकांना याची देही याची डोळा अनुभवता आला. कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागेच्या वाळवंटात स्रान करण्यासाठी गर्दी केली होती.याचबरोबर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या विविध संतांच्या ंिदड्यांनी आणि भाविकांनी प्रदक्षिणामार्ग गजबजून गेला होता. चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर परिसर, मंदिर परिसर, दर्शन बारी गोपाळपुर रोड आदी ठिकाणी भाविकांची गर्दी पहावयास मिळाली.

येणा-या भाविकांना सुलभरीत्या दर्शन व्हावे. यासाठी मंदिर समितीच्या वतीने कोरोनाचे नियम पाळत भाविकांच्या दर्शनाची सोय केली होती. दरम्यान आरोग्याच्या दृष्टिकोनातून ठिकाणी आरोग्य तपासणी केले जात होते तसेच नगरपालिकेच्या वतीने ज्यादा कर्मचा-यांची नियुक्ती करून स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते.याचबरोबर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पंढरपूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मात्र एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे आणि तिस-या लाटेच्या शक्यतेमुळे भाविकांची संख्या घटल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × 1 =

Close