कारंजा एज्युकेशन सोसायटी व जे.सी.चवरे हायस्कुलच्यावतीने शालेय साहित्य कीटचे वाटप

Read Time:2 Minute, 2 Second

(अजिंक्य जवळेकर) कारंजा एज्युकेशन सोसायटी व जे.सी.चवरे हायस्कुल तसेच आर.जे.चवरे विद्यालयाच्यावतीने शैक्षणिक साहित्य कीटचे वाटप हा नविन ऊपक्रम सुरु करण्यात आला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमीत्त व लोकमान्य टीळक यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत जे.सी.चवरे हायस्कुल येथे या ऊपक्रमाचा ऊद्घाटन सोहळा नुकताच पार पडला आहे.

कोरोनाच्या या कठीणकाळात ग्रामीण भागांतील विद्यार्थी नानाविध समस्यांमुळे शिक्षणापासून दुरावु नये हा या ऊपक्रमामागील मुळ ऊद्देश असल्याचा यावेळी सांगण्यात आले. आतपर्यंत पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या शाळांतील एकुण १०० विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्य कीटचे वाटप करण्यात आले आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव शीरीषकुमार चवरे लाभले होते. कारंजा तहसिलचे तहसिलदार धीरज मांजरे व कारंजा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन धंदर यांचीसुद्धा या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऊपस्थिती होती.

जे.सी.चवरे हायस्कुलचे प्राचार्य श्री.नांदगावकर सर यांच्या मार्गदर्शनात जे.सी.चवरे हायस्कुलमधील सर्व शिक्षकवृदांनी या ऊपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 − 1 =