कारंजातील अपघातग्रस्त तरुणांस आर्थिक मदत करण्याचे आवाहन

Read Time:1 Minute, 36 Second

काही दिवसांअगोर अमरावतीवरुन कारंजाकडे येत असतांना एक भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये कारंजातील पोलिस स्टेशन परिसरात राहणारा रोहीत ऊर्फ मोन्या महाजन हा तरुण गंभीर जखमी झाला होता. सध्या रोहीतवर अकोल्यातील रुग्णालयात ऊपचार सुरु आहे.

मात्र रोहीतची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांस ऊपचारासाठी मदत करण्याचे आवाहन त्याच्या मित्रपरिवाराकडून केले जातेय. आर्थिक मदत मिळवण्यासाठी रोहीतचा मित्रपरिवार जिकरीचे प्रयत्न करीत आहेत. कारंजात समाजमाध्यमांवर मोठ्याप्रमाणात रोहीतला मदत करण्यासाठी आवाहन केले जात आहे.
तसेच शहरातील काही संवेदनशील समाजसेवकांनी व संस्थांनी पुढाकार घेऊन रोहीतला ऊपचारासाठी मदत करावी असे आवाहनसुद्धा त्याच्या मित्रांनी पब्लीकच्या माध्यमाने कारंजेकरांना केले आहे.

रोहीतला मदत करण्यासाठी एक गुगल पे क्रमांक व खातेक्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. 9146550942 या गुगल पे क्रमांकावर व 39849658354 IFSC Code SBIN0000404 या खातेक्रमांकावरसुद्धा आपण रोहीतला मदत करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.

seventeen − 14 =