
कापसाला विक्रमी १२१०० प्रति क्विंटलचा दर
परभणी/प्रतिनिधी
सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवार, दि.२६ मार्च रोजी कापसाला विक्रमी १२१०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान कापसाला चांगला दर मिळण्यासाठी शेतक-यांनी स्वच्छ प्रतिचा कचरा विरहीत कापूस विक्रीसाठी आणावा असे आवाहन मुख्य प्रशासक रणजित गजमल यांनी केले आहे.
सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीच मोठ्या प्रमाणावर कापूस विक्रीसाठी येत असतो. कापसाला शनिवारी विक्रमी १२१०० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याने शेतक-यांत समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. या लिलावामध्ये कापूस खरेदीदार रामेश्वर राठी (मामाजी), गोपाळ काबरा, आषिश विनायके निर्मल भाई, प्रसाद फायबर ग्लोबल कॉटन, स्वास्तीक कॉटन नूतन कॉटन इ. खरेदीदारांनी कापूस खरेदी केला. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.रणजित गजमल व सर्व प्रशासक तसेच बाजार समितीचे प्र. सचिव श्री.राजीव वाघ बद्रीनाथ ताठे, दिपक शिंगणे, अशोक वाटोडे, सुरेश गायकवाड, हिंगे, राजेश गोरे, संदेश खडांगळे, विष्णू मोरे, विजय बोराडे, कैलास गलांडे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला विक्रमी दर मिळाल्याने शेतक-यांत समाधान व्यक्त होत आहे. सेलू तालुक्यातील शेतक-यांनी आपल्या कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी कापूस स्वच्छ प्रतीचा कचरा विरहीत व प्रत्येक वेचणी वेगळा साठवणूक केलेला आनावा. तसेच शेतक-यांनी आपला कापूस सकाळी १०.०० वाजण्यापूर्वी बाजार समितीच्या कापूस यार्ड पाथरी रोड येथे विक्रीस आणावा. तसेच बँक खात्याचे पासबूक झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स सोबत आनावे, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री. रणजित गजमल यांनी कापूस विक्रेत्यांना केले आहे.