January 19, 2022

काँग्रेस स्क्रिनिंग कमिटीवर वर्षा गायकवाड यांची वर्णी

Read Time:1 Minute, 52 Second

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणा-या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी स्क्रिनिंग समिती जाहीर केली आहे. या समितीवर महाराष्ट्रातून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी केसी वेणूगोपाल यांनी ही स्क्रिनिंग समिती जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जितेंद्र सिंग आणि सदस्यपदी दीपेंद्र सिंग हुड्डा आणि वर्षा गायकवाड यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, अजयकुमार लल्लू, आराधना मिसरा मोना आणि उत्तर प्रदेशातील सर्व काँग्रेस सेक्रेटरींचा समावेश आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इतकेच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेह-याबाबतही त्याच निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदारपणे तयारीला लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × two =

Close