May 19, 2022

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेवर गुन्हा दाखल करा — भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलिसात तक्रार

Read Time:1 Minute, 53 Second

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेवर गुन्हा दाखल करा — भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलिसात तक्रार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महानगर अध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे साहेबराव गायकवाड यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात केली.

पंतप्रधान हे संविधानिक सर्वोच्च पद असून पदाची गरिमा धुळीस मिळवण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस करत आहेत. ज्याप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच कलमानुसार नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे साहेबराव गायकवाड यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर, उपाध्यक्ष सुशील जाधव, चिटणीस सुनील राणे, सरचिटणीस संदीप पावडे, मंडळ अध्यक्ष आशिष नेरळकर, राज यादव सोशल मीडिया संयोजक,बालाजी सूर्यवंशी, सोनू उपाध्ये, चक्रधर कोकाटे पदाधिकारी कार्यकर्ते भाग्य नगर पोलीस स्टेशन उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published.

14 − three =

Close