काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता?; हा बडा नेत्या भाजपच्या वाटेवर?

Read Time:1 Minute, 43 Secondमुंबई | काँग्रेसमधील (Congress) अनेक दिग्गज नेत्यांना भाजपकडून (BJP) पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले कै. पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांचे पुत्र आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam)यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि काही महिन्यातच काँग्रेस मधील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेशाच्या ऑफर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात विश्वजीत कदम यांचे देखील नाव आघाडीवर आहे.

विश्वजीत कदम यांना भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर आहे की बदलती परिस्थिती पाहता विश्वजीत कदमच भाजपसोबत जाण्यास उत्सुक आहेत हा देखील एक मोठा चर्चेचा विषय आहे.

काही दिवसांपूर्वी सांगली दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विश्वजित कदम यांच्याशी बंद दाराआड चर्चा झाल्या होत्या.

सायरस मिस्त्री यांच्या अपघातासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!

“तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत”Leave a Reply

Your email address will not be published.

eleven + 16 =