काँग्रेसच्या आगामी अध्यक्षाबाबत महत्त्वाची अपडेट समोर!

Read Time:1 Minute, 54 Second


नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष पदावर (Congress President) कोण विराजमान होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसच्या आगामी अध्यक्षाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

अशोक गेहलोत यांनी केरळमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं मी त्यांना अनेकवेळा विनंती केली की त्यांनी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष व्हावं, ही सर्वांची इच्छा मान्य करावी. मात्र त्यांनी मला सांगितलं की, यंदा गांधी घराण्यातील कोणीही व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभा राहणार नाही, असं गेहलोत म्हणालेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Election 2022) लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी जाहीरच करुन टाकलं आहे.

या निवडणुकांबाबत मी लवकरच अर्ज दाखल करण्याची तारीखही जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काँग्रेस अध्यक्ष पद फक्त विरोधी पक्ष बळकट करण्यासाठी मला ही निवडणूक गरजेची असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“…हे सगळं बघून भाजपच्या पायाखालची जमीन सरकली”

मार्क झुकरबर्गला सर्वात मोठा झटका; ती चूक पडली महागात?

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × two =