काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी मतदान

Read Time:2 Minute, 0 Second

नवी दिल्ली : संकटात सापडलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असून १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.

केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष आणि पक्षाच्या पुढील अध्यक्षांच्या निवडीच्या तारखेबाबत विचारमंथन होणार आहे. बैठकीनंतर तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती देखील समोर आली होती. दरम्यान सोनिया गांधी व्हर्च्युअली उपस्थित राहून या बैठकीचे अध्यक्षपद भूषविणार असल्याचे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे सोनिया गांधी सध्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेश दौ-यावर असून राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत आहेत. दरम्यान गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावरही चर्चा होऊ शकते अशी माहिती समोर आली होती.

काँग्रेसने काही दिवसांपूर्वी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे ढकलली होती. काँग्रेसने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की, या वर्षी २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten − four =