January 25, 2022

लाॅकडाउनच्या वाढत्या भीतीने परप्रांतीय मजूर परतीच्या मार्गावर

Read Time:3 Minute, 33 Second

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ता. 25 मार्च ते ता. चार एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. गतवर्षी देखील काही दिवसांसाठी लावलेला लाॅकडाऊन अनेक महिने वाढल्याचा अनुभव लक्षात घेता दुसऱ्यांदा लावण्यात आलेला लाॅकडाऊन देखील वाढण्याच्या भीतीने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान राज्यातील मजूर गावी परतण्यासाठी नांदेड रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहेत. रेल्वे व अन्य मार्गाने आपले गाव जवळ करत असल्याने कशी नशिबाने थट्टा आज मांडली म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर रोजगारासाठी दाखल झालेला आहे. काही जण भेळ पाणीपुरीचा व्यवसाय करतात, राजस्थान राज्यातील फरशी बसविण्याचे काम मोठ्या प्रमाणात करणारा देखील मंजूर आहे. तसेच सराफा कारागीरसुद्धआ याच भागातून येथे आलेले आहेत. ते आपल्या हाताला मिळेल ते विविध कामे करुन उपजीविका भागविणारे परप्रांतीय मजूर कुटुंबीयांसह आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने लाॅकडाउन अकरा दिवसांचा जाहीर केला असला तरी तो अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परप्रांतीयांचे व्यवसाय, मजुरी बंद झाली आहे. उपासमारीची वेळ परप्रांतीय मजुरांना वाटत आहे.

ता. 24 मार्चपासून विविध भागातील मजूर नांदेडसह पूर्णा, परभणी, मुदखेड, औरंगाबाद आदी रेल्वेस्थानकावर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातील आपल्या मुळ गावाकडे जाण्यासाठी दाखल होत आहेत. सध्या केंद्र सरकारने लाॅकडाऊन जाहीर केला नसून रेल्वेगाड्या सुरु आहेत. रेल्वेने मजूरवर्ग गावाकडे परतत आहेत. काही मजूरांकडे गावी परतण्यासाठी पैसे देखील नाहीत. तर काहींना भोजनगृहण करण्यास देखील पैसे नाहीत. या स्थितीमध्ये मजूर हतबल होत असून अनेक मजूरांनी आपल्या अडचणी मांडत आहेत.

जर लाॅकडाऊन वाढत गेला तर पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊन सर्व कुटुंब अडचणीत पडेल, त्यामुळे येथील कामधंदा बंद झाल्याने जगावे कसे असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. बिहारमधील मजूर नदीपात्रातून वाळूचा उपसा करणारा मजूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आलेला आहे. लाॅकडाऊन झाल्यामुळे गावाकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकात दाखल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

Close