January 21, 2022

कर्नाटक सरकारची मुजोरी सुरुच

Read Time:2 Minute, 37 Second

बंगळुरु : बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. मात्र त्याविरोधात आवाज उठवणा-या मराठी बांधवांवर कानडी पोलिसांची मुजोरी सुरुच असून, बेळगावमध्ये ६१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर २७ जणांना अटक केली आहे. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडीही सुनावली आहे.

मराठी बांधवांच्या घरी मध्यरात्री जाऊन कारवाई करण्यात आली. कारवाईत काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याचा आरोप कानडी पोलिसांवर करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने याविरोधात आवाज उठवावा, अशी मागणी सीमावर्ती भागातील रहिवाशांकडून केली जात आहे.

बंगळुरूमध्ये शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. यानंतर या प्रकाराच्या निषेधार्थ बेळगावातील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले. त्यांनी कानडी व्यापा-यांना दुकाने बंद करावयास लावली. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली असून, सध्या तेथे तणावाचे वातावरण आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून विटंबना करणा-यांवर कारवाईची अपेक्षा असताना त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. परिणामी सध्या बेळगाव सीमाभागासह महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे.

जामीन मिळू नये यासाठी १४ कलमे
पोलिसांनी शनिवारी पहाटेपासूनच आंदोलकांची धरपकड सुरू केली. युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह २७ जणांना अटक केली आहे. जामीन मिळू नये यासाठी १४ प्रकारची कलमे त्यांच्याविरोधात लावली आहेत. शनिवारीच न्यायालयाने त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख नेत्या सरिता पाटील यांच्यासह ३४ जणांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × five =

Close