January 19, 2022

करुणा शर्मा प्रकरणावरुन पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका ….म्हणाल्या

Read Time:2 Minute, 2 Second

करुणा शर्मा प्रकरणावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली आहे. नाव न घेता त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाना साधला आहे. “प्रशासन दावणीला बांधलेले असले की खोटे गुन्हे दाखल होतात. आणि हेच सुरु आहे बीडमध्ये ……जिल्ह्यात शासन आणि प्रशासन मिळून अन्याय करत आहे. अशावेळी न्याय मागायला जायचे कुणाकडे……” असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

काही दिवसांअगोदर धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणार्‍या करुणा शर्मा या परळी शहरात आल्या होत्या. तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये पिस्तुल आढळले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर एट्रॉसीटीचासुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरुनच अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर निशाना साधला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बीड जिल्ह्यातसुद्धा महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. परळी जवळच असणार्‍या सोनपेठमध्ये मन पिळवटून टाकणारी घटना घडली असल्याचेसुद्धा पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

बीडसह महाराष्ट्रात होणार्‍या महिला अत्याचाराच्या घटनांवर मी तीव्र संताप आणि निराशा व्यक्त करते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकींमध्ये बजेट वाटपासोबतच महिला सुरक्षेच्या विषयावरसुद्धा चर्चा होणे गरजेचे असल्याचेसुद्धा पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight − 1 =

Close