करंटला चिकटलेल्या व्यक्तीला करंट पासून दूर कसे करावे व तिथल्या तिथे प्रथमोपचार करून जीव कसा वाचवायचा!


करंटला चिकटलेल्या व्यक्तीला त्याच्या पासून दुर करण्यासाठी ज्या कारणामुळे करंट लागले ते कारण दुर करावे म्हणजे मेन लाईन ताबडतोब बंद करावे, सोबत इन्व्हर्टर असल्यास त्याचे स्विच बंद करावे. जर काही कारणाने मेन स्विच बंद करणे शक्य नसल्यास, अथवा विलंब होत असल्यास सुके लाकुड,वुलन ची ब्लॅकेंट, घोंगडी,हॉकी अथवा क्रिकेट ची बॅट घेऊन अपघाती व्यक्तीच्या अंगाला आपल्या शरीराचा स्पर्श न होऊ देता त्यांच्या द्वारे करंट पासून दुर करावे. सर्वसाधारणपणे एक माहिती प्रचलित आहे की आपण जर लाकडा वर उभे राहिले तर करंट लागत नाही. परंतु जर आपण लाकडावर उभे राहून करंटला चिकटलेल्या व्यक्तीला आपल्या हाताने स्पर्श केल्यास समांतर पध्दतीने जोडले जाऊन आपणही करंटला चिटकवून जाणार.*………*अपघाती व्यक्तीला करंट पासून दुर केल्या नंतर खरबदारी घेणे खुप गरजेचे आहे. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला प्रेमपूर्वक बोलावे त्याला रागाऊ नये कारण ती व्यक्ती खुप घाबरलेल्या अवस्थेत व त्याचा बी पी अनियमित होऊन जातो. त्याला करंट पासून दुर केल्या नंतर एका सपाट व्यवस्थित ठिकाणी झोपवावे व सर्व प्रथम त्याचे कपडे सैल करावे,कपडे पुर्णं पणे खोलण्याची आवश्यकता नाही. हवेशीर वातावरण निर्माण करावे ,ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधुन डॉक्टरलाच अपघात स्थळी बोलवावे…. अपघाती व्यक्तीला डॉक्टर कडे घेऊन जाण्याची घाई करू नये. प्रथमोपचार ताबडतोब सुरू करावे. डॉ येईपर्यंत प्रथमोपचार करून डॉ आल्यावर डॉक्टर च्या स्वाधीन करावे…..जर अपघाती व्यक्ती शुध्दीवर असेल तर त्याला चुकून पाणी न पाजवता जर तो काही पिण्याच्या स्थितीत असेच तर त्याला उत्तेजीत करणारे पेय जसे कॉफी, चहा पाजवावे. तसे प्रथमोपचार करण्याच्या पद्धती मध्ये ब्रांडी पाठवण्याची ही सुचना आहेत परंतु मी व्यसनविरोधी असल्याने हा सल्ला देत नाही. कोणत्याही एका चहा अथवा कॉफी पाजले तरी तेच कार्य होते… ह्या मुळे त्याच्या बी पी बरोबर होण्यासाठी मदत होते*…..*जर त्याला जखम झाली असेल तर त्याला चुकन ही आपल्या कडून इजा होऊ देऊ नये त्या जखमेवर पातळ सुती कापड झाकावे कारण माशा, डासांचा त्रास होऊ नये.*…… *करंट लागल्या नंतर प्रथमोपचार चे एकूण चार प्रमुख प्रकार आहेत परंतु आपण तीन प्रकाराची माहिती घेऊ. 1) शेफरची कृत्रिम श्वासोच्छ्वास पध्दत 2) सिल्वेस्टर ची पध्दत 3) माऊथ टु माऊथ पध्दत*……..*शेफरच्या या पध्दधती मध्ये अपघाती व्यक्तीला प्रथमोपचार करण्यासाठी एकाच व्यक्तिची गरज असते. अपघाती व्यक्तीला करंट पासून दुर केल्या नंतर कपडे सैल करून त्याला पालथे झोपवून त्याचे तोंड उशी वर ठेवून तोंड एकी कडे वळवावे व दोन्ही हात डोक्याच्या वरच्या भागात लांब पसरावे. मग उपचार करणाऱ्या व्यक्ती ने अपघाती व्यक्तिच्या पाठीवर छातिच्या खालच्या बाजूला आपले दोन्ही पाय गुडघ्यावर टेकवून तळवे एक मेकांना सरळ रेषेत ठेवून आपल्या दोन्ही हातांचे बोटे अपघाती व्यक्तीच्या दोन्ही बाजूला छातीच्या खाली शेवटच्या बरगडी पर्यंत येतील अशी काळजी घेऊन उपचार करणाऱ्या व्यक्ती ने किंचित पुढे झुकावे व अपघाती व्यक्तीच्या पाठीवर हलकेच दाब द्यावा.ही क्रीया अगदी संथ पणे करावी.या मुळे अपघाती व्यक्तीच्या छातीत गुदमरलेली हवा हळूहळू बाहेर जाईल. नंतर हाताची व बोटांची स्थिती न बदलता उपचार करणाऱ्याने सावकाश मागे झुकावे व क्षणभर थांबून हळूहळू पुढे झुकन दाब वाढवत जावा.या दोन्ही क्रियामुळे अपघाती व्यक्तीच्या फुफ्फुसांना हळूहळू चालना मिळून श्वासोच्छ्वास सुरू होतो. श्वासोच्छ्वास सुरू होण्यास लागणारा कालावधी हा अपघाताच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. उपचार करणाऱ्याने वर दिलेली क्रिया अपघाती व्यक्तीच्या श्वासोच्छ्वास चालू होईपर्यंत करीत रहाणे जरुरीचे असते.*……….. *आता आपण प्रथमोपचार ची दुसरी सिल्वेस्टरची पध्दत पाहु. या उपचार करण्यासाठी दोन व्यक्तींची आवश्यकता असते. या पध्दतीत करंट पासून दुर केल्या नंतर कपडे सैल करावे व त्याला पाठीवर झोपवून तिच्या खांद्याखाली जाड उशी ठेवतात. या मुळे डोके मागे झुकुन जमीनीला टेकते. त्यानंतर हात डोक्याच्या बाजूला वर घेऊन उपचार करणाऱ्यांपैकी एकाने हात धरून ठेवून दुसऱ्याने अपघाती व्यक्तिची जीभ बाहेर काढून धरावी. नंतर उपचार करणाऱ्यांपैकी दुसऱ्याने अपघाती व्यक्तीच्या मुठी मिटवून मनगटाजवळ हात पकडून ते छातीच्या बाजूस कोपरामध्ये दुमडून छातीवर हलकेच दाब द्यावा. मिटलेल्या मुठीने हात हळूहळू डोक्याकडे आणावे. या वेळी दुसऱ्याने जीभ सैल सोडावी. क्षणभर थांबून परत बेताने जीभ खेचावी व छातीवर हलकेच दाब देऊन हात परत डोक्याकडे आणावेत या दोन्ही क्रिया मुळे अपघाती व्यक्तीच्या फुफ्फुसांना हळूहळू चालना मिळून श्वासोच्छ्वास सुरू होतो.*…………*आता आपण तिसरी माऊथ टु माऊथ अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने प्रथमोपचार करायची पध्दत पाहु . या पध्दतीत अपघाती व्यक्तीच्या वर प्रथमोपचार करण्यासाठी फक्त एका व्यक्तिची आवश्यकता असते. अपघाती व्यक्तीला करंट पासून दुर केल्या नंतर कपडे सैल करून त्याला सरळ झोपवून कोण्याही एका व्यक्तीने त्यांच्या तोंडाला तोंड लावून आत मध्ये फुकांवे व क्षणभर थांबून ही क्रिया जो पर्यंत ती व्यक्ती शुध्दीवर येत नाही तो पर्यंत करत राहावे. या मुळे सुध्दा बंद पडलेल्या फुफ्फुसांना चालना मिळून श्वासोच्छ्वास सुरू होतो.*……… *करंट लागलेल्या व्यक्तीचे फुफ्फुस करंट लागल्या मुळे थांबून जातो आपण या तीनही मधून कोणत्याही पद्धतीने त्याच्या फुफ्फुसाला चालना मिळून दील्यास श्वासोच्छ्वास सुरळीतपणे चालू होऊन त्याचा जीव वाचविण्यासाठी मदत मिळते.*………..*तसे आपल्या सिनेमा सृष्टीत अनेक गोष्टी चांगल्या ज्ञानवर्धक असतात. परंतु अनेकदा ज्ञान देणाऱ्या डायरेक्टर च्या अज्ञानाचा लोकांना फार मोठा फटाका बसण्याची शक्यता असते कारण खुप सिनेमा प्रेमी सिनेमा मध्ये दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात. असेच एका सिनेमाचे विशेषतः उल्लेख करने गरजेचे वाटते. मी चुक नसेल तर शिवाजी नावाच्या पिक्चर मध्ये करंट लागल्या नंतर प्रथमोपचार करण्याची एक खरी पध्दत दाखवीली परंतु दुसऱ्या पध्दतीत अज्ञानते मुळे म्हणा अथवा हीरोला फार शक्तिशाली दाखवून प्रसिद्धी मिळावी म्हणून का असेना फारच चुकीचे प्रदर्शन केले आहे.*…….* *या पिक्चर मध्ये एका दृश्यात एका कामगारांच्या लहान मुलाला बांधकाम होत असलेल्या ठीकाणी करंट बसुन तो बेशुद्ध होतो तेंव्हा तेथे आलेल्या डॉक्टर तीसरी माऊथ टु माऊथ पध्दत वापरुन त्याचा जीव वाचवितो.*……..*परंतु दुसऱ्या सीन मध्ये दुर्दैवाने हीरोगीरी दाखविण्यासाठी हीरो पोलिस कस्टडी मध्ये स्वतः स्वताला करंट लावून घेतल्या नंतर डॉक्टर त्याला गरम प्रेस चे चटके देऊन त्याचा जीव वाचवीतात हा फार निंदनीय व घातक दृश्य प्रदर्शित केलेला आहे. म्हणून कधी ही शिक्षणाच्या अभ्यासक्रम मध्ये जे दीलेले आहेत तेच आपण पुर्ण पणे माहिती घेऊनच उपयोगात आणले पाहिजे. मी फक्त माहिती साठी हे प्रथमोपचाराच्या पध्दती बद्दल माहिती दिली जर पुर्ण पणे समजली नसल्यास उपयोगात आणु नये. जर नांदेड शहरा पुर्ते पन्नास व्यक्ती एकत्रित येऊन प्रबोधन आयोजित केल्यास मी प्रत्यक्ष एक तासाचे करंट लागु नये व प्रथमोपचार कसे करावे याची प्रात्यक्षिक सोबत मोफत माहिती ची सेवा देण्यासाठी तयार आहे.

-राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ

शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड

7700063999

विशेष सुचना # जर अपघाती व्यक्तीचे शरीर खुप जास्त प्रमाणात जळालेल्या अवस्थेत असेल व जर अपघाती व्यक्ती खुप उंची वरून खाली पडून डोक्यात अथवा शरीरात खुप मोठ्या प्रमाणात जखमा झाल्यास माझ्या मते असे हे प्रथमोपचार कामी येणार नाही अशा वेळी ताबडतोब डॉक्टरच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे.*


Post Views: 29


Share this article:
Previous Post: सोमवारी मुखेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

June 21, 2024 - In Uncategorized

Next Post: माजी राज्यमंत्री सुर्यकांत पाटील यांचा भाजपाला रामराम

June 22, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.