August 19, 2022

कमी कर वसुलीचा फटका दोन वसुली लिपीक निलंबित‌ तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा.

Read Time:1 Minute, 28 Second

ध्

नांदेड दि.२२-  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका  क्षेत्रीय क्र.४ वजीराबाद झोन मधील क्षेेत्रिय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, पर्यवेक्षक वसुली लिपीक यांची महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी स्टेडियम येथे आढावा बैठक घेतली. वजीराबाद कार्यालया अंतर्गत कर वसुली चे प्रमाण कमी असल्याने वसुली लिपीक रमेश यशवंतकर व लखन कुंटे या दोन वसुली लिपीकांना मा.आयुक्तांनी निलंबित केले. तर रमेश वाघमारे,अजहर अली, किरणसिंघ,क्षेत्रीय.अधिकारी डॉ.रईसोद्दीन यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत आदेश दिले..

मा. आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी क्षे.अधिकारी , पर्यवेक्षक व वसुली लिपीक यांना वसुली वाढविण्याच्या सुचना केल्या . तसेच जे मालमत्ता धारक कर भरणा करत नाहीत . त्या मालमत्ता जप्त करणे,नळ खंडीत ,डेनेज खंडीत करण्याच्या सूचना केल्या.

या बैठकीला सहा.आयुक्त सदाशिव पतंगे व दत्तात्रेय पाटील हे उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

5 + four =

Close