July 1, 2022

कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन

Read Time:2 Minute, 20 Second

बंगळुरू : कन्नड मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या २१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिला काल (१६ मे) सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर ‘फॅट फ्री’ शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला शरीरामध्ये काही बदल जाणवले. फुफ्फुसात पाणी शिरल्याने संध्याकाळी तिची तब्येत खालावली. तिला श्वास घेण्यात देखील त्रास जाणवू लागला.

मीडिया रिपोर्टनुसार, चेतनाने या शस्त्रक्रियेबाबत तिच्या आई-वडिलांना माहिती दिली नव्हती. तिच्या मैत्रिणींसोबत ती शस्त्रक्रिया करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांच्या मुलीचा अकाली मृत्यू झाल्याचा दावा चेतनाचे पालक सध्या करत आहेत.

चेतनाचा मृतदेह हा बंगळुरूमधील हॉस्पिटलमध्ये आहे. तिचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रमाय्या रुग्णालयात हलवण्यात येईल. याप्रकरणी नजीकच्या पोलिस ठाण्यात रुग्णालय समितीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच देण्यात येणार आहे. ‘गीता’ आणि ‘दोरेसानी’ यांसारख्या मालिकांमध्ये चेतनाने काम केले होते. चेतना राजचे कुटुंब हे बंगळुरूमधील अबेगेरे येथे राहत होते. चेतनाने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen + 3 =

Close