August 19, 2022

कंपनी मालकांचा एकतर्फी निर्णय | कामगारांचे बेमुदत उपोषण

Read Time:1 Minute, 42 Second

सिट्रस प्रोसेसिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कृष्णूर , नांदेड येथील कामगारांचे बेमुदत उपोषण…

बरबडा : बरबडा सर्कलमध्ये असलेल्या कुष्णूर औद्योगिक वसाहत येथे कंपनीच्या मालकांनी एकतर्फी निर्णय घेऊन कंपनी ता.२७ डिसेंबर २०२१ पासून कायमची बंद होणार असे पत्रक गेटवर लावण्यात आले. तेथील औरंगाबाद मजदूर युनियन व कंपनी स्टॉप मधील कायमचे असलेले कामगार यांना नोकरी समाप्तीचे पत्रक हे पोस्टाने घरी पाठवले. त्यामुळे तेथील युनियनचे कायमस्वरूपी असलेले ४३ कामगार व स्टॉप मधील कर्मचारी संख्या ८० पर्यंत होती. कंपनी बंदच्या निर्णयाने हजारो कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची दिवस आले आहेत. युनियनच्या कामगाराच्या चक्री उपोषणाकडे लक्ष वेधावे व त्यांना कामगारांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व लवकरात लवकर कंपनी चालू करावी अशी मागणी होत आहे.

 

औरंगाबाद मजदूर युनियन युनिट – सिट्रस प्रोसेसिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नांदेड

स्थानिक कमेटी : गणपत मुंडकंर, संतोष जाधव, भीमाशंकर सोनटक्के, राहुल जुनागडे, राहुल आढाव

Leave a Reply

Your email address will not be published.

one + 4 =

Close