कंगनाने ऊडवली राष्ट्रपिता महात्मा गांधींजींची खिल्ली! गांधीजीच्या अहिंसा तत्वाचा केला अशाप्रकारे अपमान

Read Time:2 Minute, 16 Second

 

बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणावत नेहमि आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असते. काही दिवसांअगोदरच कंगनाने स्वातंत्र्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. ज्यातुन स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान झाला होता. आता त्याच विधानाचा आधार घेऊन कंगनाने थेट राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचाच अपमान केला आहे.

१९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य भिकेत मिळाले असल्याचे कंगना म्हणाली होती. एका गालावर मारल्या नंतर दुसरा गाल समोरे केल्याने भिकच मिळतेवअसे असे विधान कंगनाने केले. याशिवाय म.गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसींग या क्रांतीक‍ारकांना कधीच पाठिंबा दिला नसल्याचे ती म्हणाली आहे.

कंगनाच्या या विधानामुळे गांधीप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आज संपूर्ण जग ज्या गांधीजींचा आणि त्यांच्या अहिंसेचा आदर्श घेतो त्या गांधीजींबाबत असे विधान करणे म्हणजे एकप्रकारे भारताचाच अपमान करण्यासारखे असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे.

महाराष्ट्रतुनसुद्धा कंगना रणावतवर यामुळे टीका होते आहे. आज देशाचे पंतप्रधानसुद्धा गांधीजींच्या स्मृतिस्थळावर जाऊन नतमस्तक होतात. गांधीजी केवळ देशाचा नाही तर जगाचा आदर्श असल्याचे शिवसेना खा.संजय राऊत म्हणाले आहेत. गांधी आणि नेहरु परिवाराचे जाणिवपुर्वक चरीत्रहनन करण्याचा प्रयत्न या देशात सुरु असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत. नेटकर्‍यांनीसुद्धा कंगनाला चांगलाच निशाना बनवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

12 + two =