कंगनाचे नवे वादग्रस्त विधान

Read Time:2 Minute, 2 Second

मुंबई : वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणा-या अभिनेत्री कंगना राणावतने आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचे वक्तव्य केले आहे. यावरून नवा वाद निर्माण झालाय. तिच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे.

खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण देशाच्या एकमेवर महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडले होते. अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावे लागले ते महत्त्वाचे नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशके झाली तरीही त्यांच्या नावाने हे थरथर कापतात. त्यांना असाच गुरू पाहिजे, असेही कंगनाने म्हटले आहे. सध्या ही गोष्ट अधिक कालसुसंगत होत आहे.

लवकरच तुमच्यासाठी आणीबाणी आणेल, असेही कंगनाने म्हटले आहे. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्याविरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने तक्रार दाखल झाली आहे. कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × five =