कंगणा राणावतविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल

Read Time:1 Minute, 5 Second

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगणा राणावत आता एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडचणीत आली आहे. शीख धर्मियांबद्दल अपशब्द वापरून भावना भडकाविणारा संदेश पोस्ट केल्याप्रकरणी तिच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कंगनाने शीख धर्मियांना खलिस्तानी दहशतवादी असे संबोधले. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन खलिस्तानी चळवळ आहे, असे तिने म्हटले आहे. तसेच १९८४ च्या शीख हत्याकांडाची आठवण करून देत तिने शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × two =