August 19, 2022

औराद शहाजनी येथे गौरीसोबतच लोकनेत्याचेही पूजन

Read Time:1 Minute, 34 Second

निलंगा : तालुक्यातील औराद शहाजानी येथील व्यापारी नंदू विश्वनाथराव भंडारे या व्यापा-याने गौरी पूजन दिवशी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन केले.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील व्यापारी नंदू भंडारे हा व्यापारी प्रत्येक वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या दुकानात देवाचे पूजन करण्याऐवजी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून लक्ष्मीपूजन करीत असतो या निमित्ताने लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिल्याने आजही औरादच्या तेरणा काठी त्यांचा आवाज घुमत असल्याचे निदर्शनास आले आहे.

यावेळी विश्वनाथराव भंडारे, भारतबाई भंडारे, पांढरी भंडारे, प्रताप भंडारे, नंदू भंडारे, राजू भंडारे, उषा भंडारे, सुमित्रा भंडारे, सुनंदा भंडारे, सुवर्णा भंडारे, श्रद्धा भंडारे, नारायण भंडारे, हारी भंडारे, उद्धव भंडारे, वैभव भंडारे, ओम भंडारे, जानकी भंडारे, यशोदा भंडारे, शिवदास भंडारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × 1 =

Close