औरंगाबादेत लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा उघड

Read Time:2 Minute, 19 Second

औरंगाबाद : लस न घेता लसीकरणाचे सर्टिफिकेट देणा-या टोळीवर कारवाईच्या घटनेला काही तास उलटत नाही, तोच आता औरंगाबादमध्ये आणखी एक लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बोगस सर्टिफिकेट एडिट करून लोकांना वेगवेगळ््या किमतीत विकणा-या टोळीचा औरंगाबाद शहर पोलिसांनी भांडाफोड केला आहे.

औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या आरटीओ कार्यालयासमोर दोन वेगवेगळ््या ओमनी गाडीत बसून दोन व्यक्ती एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मूळ लसीकरण प्रमाणपत्र एडिट करून दुस-याच आधार कार्ड नंबर आणि नाव टाकून बोगस सर्टिफिकेट बनवत असल्याची माहिती औरंगाबाद शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने धाड टाकत दोघांना ताब्यात घेतले. शेख मिनाजद्दीन शेख अशफाकउद्दीन, अदनान अल्ला मुजीब बेग, अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांना त्यांच्याकडे ंिप्रंटर, कॉम्प्युटर आणि सर्टिफिकेट बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य मिळाले आहे.

कालच औरंगाबादमध्ये बोगस सर्टीफिकेट बनवणा-या शासकीय डॉक्टर आणि नर्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेला काही तास उलटत नाही तोच आता पुन्हा बोगस लसीकरण प्रमाणपत्र तयार करून देणा-या आणखी एका टोळकीला पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये लसीकरण मोहीम जशी-जशी कडक राबवली जात आहे, त्याचप्रमाणे बोगस लसीकरण तयार करणा-या लोकांची संख्याही वाढत आहे. औरंगाबाद पोलिसांनी अशा प्रकरणांची गंभीरपणे दखल घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 + two =