‘ओमिक्रॉन’चा पहिला फोटो जारी

Read Time:2 Minute, 25 Second

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा ओमिक्रॉन विषाणूने जगभरात काळजीचे वातावरण निर्माण केले आहे. हा विषाणू कोरोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा अनेक पटींनी धोकादायक असल्याचेही तज्ज्ञ सांगत आहे.

मात्र, अद्यापही या विषाणूबाबत पुरेशी माहिती समोर आलेली नाही. या विषाणूच्या संरचनेत अनेक बदल झाल्याने हा अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक झाल्याचे निरीक्षण संशोधक व्यक्त करत आहेत. मात्र, या विषाणूचे बदललेले रुप नेमके कसे आहे? हे अद्याप समोर आले नव्हते. आता रोममधील विख्यात बांबिनो गेसू रुग्णालयाने ओमिक्रॉनचा पहिला फोटो जारी केला आहे.

या रुग्णालयाने त्रिमितीय (थ्री डायमेंशनल) फोटो जारी केला आहे. हा ओमिक्रॉनचा फोटो एखाद्या नकाशासारखा (मॅप) दिसतो आहे. यात ओमिक्रॉन विषाणूच्या रचनेत डेल्टाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यात सर्वात महत्त्वाचे बदल प्रोटिनवर झाले आहेत. हेच प्रोटिन कोरोना विषाणूला मानवी शरिरात प्रवेश करण्यास मदत करतात, अशी माहिती या रुग्णालयातील संशोधकांच्या पथकाने दिली.

ओमिक्रॉन विषाणूचा नवा फोटो कसा तयार केला?
बोसवाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन विषाणूंवर संशोधन करून शास्त्रज्ञांनी त्यांच्या संरचनेची एका विशिष्ट क्रमाने मांडणी केली. वैज्ञानिकांना उपलब्ध या सर्व माहितीचा वापर करून ओमिक्रॉनच्या बदलांचा विचार करत हा फोटो तयार करण्यात आला आहे. तुलनात्मक अभ्यासासाठी ओमिक्रॉनच्या फोटोसोबत डेल्टा विषाणूचाही फोटो देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + 6 =