ओमकांत चिंचोळकर यांची “तेरा बाप आया’ ही रिल व्हायरल


नांदेड(प्रतिनिधी)-लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी काल आपला वाढदिवस साजरा करतांना केलेले शस्त्र प्रदर्शन मान्य करता येईल काय? हा प्रश्न समोर आला आहे. मागे दोन वर्षापुर्वी नाशिक पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी नाशिक पोलीस परिक्षेत्राचे पोलीसांनी घरीच जन्मदिवस साजरा करावा असे आदेश दिले होते. नाशिक पोलीस परिक्षेत्राचे आदेश नांदेडला लागू असतात की, नाही याबद्दल आमचा अभ्यास कमजोर आहे.
लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांचा 5 एप्रिल रोजी वाढदिवस होता. या संदर्भाने त्यांच्या काही चाहत्यांनी अनेक शस्त्रांसह त्यांची रिल तयार करून त्यावर सिनेमामधील तेरा बाप आया हे गाणे जोडले होते. काही दिवसांपुर्वीच चंद्रकांत क्षीरसागर यांच्यावर फेसबुकचा फोटो पाहुन त्यांच्याविरुध्द हत्यार कायद्याची कार्यवाही ओमकांत चिंचोळकर यंानी केली होती. पण आपली रिल बनवतांना त्यांनी दाखवलेले शस्त्र शासकीय असले तरी ते अशा प्रकारे दाखवता येतील काय? हा प्रश्न समोर आला आहे. कोणाचे बाप बनायचे आहे त्यांना ? आणि त्यासाठी शासकीय शस्त्रांचा उपयोग करता येईल काय? असे अनेक प्रश्न तयार झाले आहेत. त्यांच्या शेजारी उभे असलेले ते दोन लोक नक्कीच पोलीस दलाचे अंमलदार नाहीत हे त्यांच्या उभ्या राहण्याच्या परिस्थितीवरूनच स्पष्ट होते. त्यानंतर असंख्य फोटो व्हायरल करण्यात आले. त्यातील व्यक्तींचा ईतिहास मात्र आम्हालाही कळला नाही.

दोन वर्षापुर्वी नाशिक पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी आदेश जारी केले होते की, पोलीसांनी आपला जन्मदिन घरीच साजरा करावा. कारण जन्मदिवस हे शासकीय काम नाही. ते खाजगी काम आहे. म्हणून शासकीय कामात त्या खाजगी कामाचा अडथळा नको म्हणून डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी हा आदेश जारी केला होता. डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या आदेशाची बातमी करत महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार विजयसिंह होलम यांनी प्रसिध्द केली होती. पण नाशिक पोलीस परिक्षेत्राचे आदेश नांदेड पोलीस परिक्षेत्रात लागू असतात की नाही हे जाणून घेण्यासाठी आमचा अभ्यास कमजोर पडला.लोह्यातील काही जण सांगतात की सायंकाळी आतिषबाजी सुध्दा करण्यात आली होती. पण त्या संदर्भाचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ आम्हाला उपलब्ध झाला नाही.

संबंधित रिल…

https://www.facebook.com/share/v/a1SHWbAyN6iyghgW/?mibextid=xfxF2i


Post Views: 772


Share this article:
Previous Post: अर्धापूरच्या पोलीस निरिक्षकांनी ओव्हरलोड विटांच्या पाच गाड्या पकडल्या; 1 लाख 40 हजारांचा दंड

April 6, 2024 - In Uncategorized

Next Post: ढिसाळ नियोजनाने महाभारत एक्सप्रेसमध्ये घडला राडा; वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांमुळे लोकसभेच्या निवडणुकीत वातावरण बिघडेल काय?

April 6, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.