ऑनलाईन फसवणूक झालेली 50 हजार रुपये रोख रक्कम न्यायालयाच्या आदेशाने परत मिळाली


नांदेड(प्रतिनिधी)-ऑनलाईन फसवणूक झालेले 50 हजार रुपये रोख परत मिळाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना भेटून त्यांना आणि नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागाला धन्यवाद दिले आहेत.
दि.28 डिसेंबर 2023 रोजी राजीव मिरजकर (59) यांच्या मोबाईलचा रिमोट ऍक्सेस घेवून त्यांच्या इंटरनेट बॅंकींग मार्फत 50 हजार रुपये आपल्याकडे वर्ग करून घेतल्याचा फसवणूकीचा प्रकार घडला होता. राजू मिरजकर यांनी सायबर पोलीस स्टेशन नांदेडकडे धाव घेतली आणि सायबर पोलीसांनी याबाबतची तक्रार एनसीसीआरपी या पोर्टलद्वारे स्विकारून बॅंकेच्या नोडल अधिकाऱ्यांना पाठवले. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. बॅंक नोडल अधिकाऱ्याने राजीव मिरजकर यांची 50 हजारांची रक्कम होल्ड करून ठेवली. त्यानंतर मिरजकर यांनी सातव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात माझी होल्ड झालेली रक्कम परत द्यावी म्हणून अर्ज केला आणि न्यायालयाच्या आदेशानंतर राजीव मिरजकर यांची ऑनलाईन फसवणूक झालेली 50 हजारांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.
नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक दळवी, पोलीस अंमलदार काशिनाथ कारखेडे, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार मारोती माने, सचिन करड यांनी परिश्रम घेवून ही रक्कम परत मिळवली. न्यायालयाच्या आदेशानंतर अर्जदाराचे पैसे परत मिळाले ही नांदेड जिल्ह्यातील पहिली घटना आहे. यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचे अभिनंदन केले आहे. आपले पैसे परत मिळाल्यानंतर राजीव मिरजकर यांनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना भेटून त्यांना आणि त्यांच्यासाठी मेहनत करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.
या माहितीसोबत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपल्यासोबत झालेली फसवणूकीबाबत सविस्तर माहिती द्यावी. किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्या फसवणूकीची माहिती भरावी आणि जवळचे पोलीस स्टेशन गाठून तेथे जाऊन तक्रार करावी. आपण जेवढ्या जलदगतीने तक्रार दाखल करताल तर आपले फसवणूकीचे पैसे परत मिळू शकतात.


Post Views: 58


Share this article:
Previous Post: पंकजनगरमध्ये घरफोडून 3 लाख 90 हजारांची चोरी; मुखेड बसस्थानकावर 66 हजारांची चोरी

May 8, 2024 - In Uncategorized

Next Post: इतवारा उपविभागातील गुन्हे शोध पथकाने एक पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे पकडली

May 8, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.