January 22, 2022

ऑक्सिजन वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसणार

Read Time:1 Minute, 23 Second

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये देशभरातील कोविड रूग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे वाद सुरू असतानाच या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने महत्वपूर्व निर्देश दिले आहेत की, कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध ऑक्सिजन वाहतुकीवर नसणार आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कोणत्याही एका राज्यासाठी मर्यादित ठेवला जाऊ शकत नाही.

केंद्र सरकारने याचबरोबर ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर पूर्णपणे बंदी केली आहे. कोरोनाच्या दुस-या लाटे दरम्यान देखील उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकार ऑक्सिजनचा पुरवठा अडवत आहेत आणि दिल्लीत ऑक्सिजनचा साठा झपाट्याने संपत असल्याची तक्रार दिल्ली सरकारने केल्यानंतर, केंद्र सरकारकडून निर्देश देण्यात आले की, ऑक्सिजन वाहतूक करणा-या वाहनांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणत्याही अडवणूकविना वाहतुकीस परवानगी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 3 =

Close