January 22, 2022

ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना…

Read Time:2 Minute, 57 Second

कोरोनाचा प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय. अशावेळी महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीय. महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. तशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे. जवळपास १०० टन ऑक्सिजन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. ही एक्सप्रेस उद्या महाराष्ट्रात दाखल होऊ शकते.

‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विझागवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. रेल्वेने देशातील सर्व नागरिकांच्या भल्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणे आणि नावीन्यपूर्ण कामे करुन कठीण काळात देशाची सेवा केली आहे, असे ट्वीट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केले आहे.

राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लांटमधून ऑक्सिजन
राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली. त्यानंतर या एक्सप्रेसवरील ७ रिकाम्या टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरण्यात आला. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास ही एक्सप्रेस विझागवरुन रवाना झाली आहे. उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत ही स्पेशल रेल्वे नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक टँकरमध्ये १५ ते २० टन लिक्विड ऑक्सिजन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकाच वेळी महाराष्ट्राला जवळपास १०० टन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होणार आहे. सकाळी ही ट्रेन विशाखापट्टणम इथं दाखल झाल्यानंतर सर्व टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरणे, वजन करणे आणि सुरक्षेची खात्री करण्यासाठी २० तासांचा अवधी लागू शकतो असे सांगण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − two =

Close