एसबीआय बॅंकेतून 2 लाख 40 हजारांची चोरी – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-एसबीआय बॅंकेच्या कॉन्टरवर ठेवलेल्या 3 लाख 2 हजार 775 रुपयांच्या बॅगमधून विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर चोरट्यांनी 2 लाख 40 हजार रुपये चोरले आहेत.
लक्ष्मण नाना मुदलोड हे पेट्रोल पंपावर मॅनेजर आहेत. दि.10 जुलै रोजी दुपारी 1 वाजता पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम 3 लाख 2 हजार 775 रुपये घेवून ते डॉक्टर्सलेन नांदेडमधील एसबीआय बॅंकेत आले. आपल्या जवळील रक्कम भरलेली बॅग कॉन्टरवर ठेवून आपली बारी येण्याची वाट पाहत ते लाईनमध्ये थांबवले होते. दरम्यान बॅंकेतील विद्युत पुरवठा खंडीत झाला आणि या संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या बॅगमील 2 लाख 40 हजार रुपये चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी ही घटना भारतीय न्याय संहितेच्या कलम 305(अ) नुसार गुन्हा क्रमांक 306/2024 प्रमाणे दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक वशिष्ट बिक्कड हे करीत आहेत.


Share this article:
Previous Post: खरेदी केलेल्या दागिण्यांवर शिक्का मारणे आवश्यक असते म्हणून डल्ला

July 11, 2024 - In Uncategorized

Next Post: जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत बिलोली तालुक्याचे वर्चस्व

July 12, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.