January 21, 2022

एसटी संपाबाबत मोठी बातमी! १०५ आगारांतुन एसटी सेवा सुरु

Read Time:2 Minute, 15 Second

 

एसटीचा संप अद्यापही कायमच आहे. राज्य सरकारने पगारवाढ केल्यानंतरसुद्धा कर्मचारी विलनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे अजुनही एसटी आगारांवर शुकशुकाटच आहे.

मात्र एक महत्वाची आणि एसटीवर अवलंबुन असणार्‍या सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. २५० पैकी १०५ आगारांतुन बससेवा सुरु झाली असल्याची माहिती मिळते आहे. १८८८८ कर्मचारी कामावर परतले असून ७३ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी विलनीकरणाच्या मागणीवरुन संपावर ठाम आहे.

१०५ आगारंतुन बससेवा सुरु होणे ही दिलासादायक बाब ठरते आहे. ७ डिसेंबरपासून नविन पगारवाढ लागु झाली आहे. पगारवाढ लागु होताच काही कर्मचार्‍यांनी संपाबाबत मवाळ भूमिका घेतलीय. त्यामुळे आता लवकरच पुन्हा एकदा एसटी महाराष्ट्राच्या रस्त्यावर धावणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत.

२९ ऑक्टोंबरपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. राज्य शासनात विलनीकरण या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मात्र विलनीकरणाच्या निर्णयासाठी व निष्कर्षासाठी शासनाकडून त्रीसदस्तीय समीती नेमण्यात आलीये. संपकर्‍यांनी पुन्हा कामावर यावे याकरिता पगारवाढ मात्र देण्यात आली.

यामध्ये नव्याने नियुक्ती झालेल्या आणि दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचार्‍यांना ५ हजारांची वाढ, १० ते २० वर्ष सेवा झालेल्या कर्मचार्‍यांना ४ हजार तर २० वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचार्‍यांना २ हजार ५०० रुपये वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × three =

Close