
एसटी महामंडळाचा कर्मचार्यांना अल्टीमेटम! २४ तासांत कामावर हजर न झाल्यास करणार ही कारावई
एसटी कर्मचारि आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र एसटी महामंडळाकडून संप मोडीत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. एसटी कर्मचार्यांचे निलंबन सत्र कायम आहे. आतापर्यंत २ हजार १७८ करम्चार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
रोजंदारीवर काम करणार्या ३०० ते ३५० कर्मचार्यांना महामंडळाने सेवासमाप्तीची कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या कामगारांनी २४ तासात कामावर हजर व्हाव, अन्यथा त्यांच्यावत सेवासमाप्तीची कारवाई करण्यात येईल असे या नोटीसीमध्ये नमुद आहे.
एसटीमध्ये रोजंदारी तत्वावर काम करणार्यांची संख्या सुमारे १२०० ते १५०० आहे. रोजंदारी कामावर पगार या निकषवार त्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात येत असते. रोजंदारीवर असणार्या कामगारांनी कामावर यावे अशी आमची अपेक्षा आहे. मात्र तेसुद्धा संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्या येईल. २४ तासांत ते निर्णय न करु शकल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात काही भागात पुन्हा एसटी सुरु झाल्याचे बघायला मिळते आहे. मंगळवारी ७६२३ कर्मचारी कामावर हजर असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत ६६ बसेस महाराष्ट्राच्या विविध भागात सोडण्यात आल्या होत्या, ज्यामधुन जवळपास दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.