January 19, 2022

एसटी बस पुराच्या पाण्यात वाहून गेली

Read Time:4 Minute, 39 Second

उमरखेड : यवतमाळात नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एसटी वाहून गेली आहे. या दुर्घटनेत चार जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती यवतमाळ जिल्हाधिका-यांनी दिली आहे. दरम्यान तर एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दोघांना वाचवण्यात यश आले आहे. बसमध्ये एकूण सहा प्रवासी होते. बस नांदेडहून नागपूरकडे जात होती. उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरून पाणी वाहत होते. बस चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ही घटना आज सकाळी ८.५० च्या दरम्यानची आहे. हिरकणी बस नांदेडहून नागपूरच्या दिशेने जात होती.

नाल्यापासून जवळपास २५ फूट दूर बस वाहत गेली. बचावासाठी बसमधील प्रवाशांनी झाडाचा आणि एसटी बसच्या टपाचा सहारा घेतला होता. यातील दोन प्रवाशांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे, तर दुपारी उशिरा एकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. मात्र, बस पाण्याखाली गेल्याने एका प्रवाशांसह ड्रायव्हर आणि कंडक्टरचा मृत्यू झाल्याची भीती तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी व्यक्त केली. देऊळगावकर यांच्या माहितीनुसार, बस चालकाच्या अतिघाईमुळे ही दुर्घटना झाली आहे. बस अजूनही पाण्याखाली आहे. बसमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफचे पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. बसमध्ये एकून सहा प्रवाशी होते. त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र या दुर्घटनेत बस चालक आणि कंडक्टर यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

नेमके काय झाले?
आज सकाळी ८.३० च्या दरम्यानची ही घटना आहे. ६ प्रवाशांना घेऊन हिरकणी बस नांदेडहून नागपूरकडे जात होती. यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे दहेगाव नाल्याला पूर आला होता. पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत होते.

अतिघाई नडली
दरम्यान बस चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याने पुलावरून बस टाकली. चालकाने काही दूरपर्यंत बस सुखरूप नेली मात्र शेवटच्या टप्प्यावर बस पाण्याच्या प्रवाहात नाल्यात वाहून गेली. पाण्याचा प्रवाह इतका होता की बस जवळपास २५ फूट दूर वाहत गेली. बसमधील प्रवाशांनी बचावासाठी झाडाचा आणि एसटीबसच्या टपाचा सहारा घेतला होता. जिवाच्या आकांताने प्रवाशी त्यांना वाचवण्यासाठी हाक मारतानाचा व्हीडीओ पुढे आला आहे.

गावक-यांच्या इशा-याला केला कानाडोळा
पाण्याच्या प्रवाहातून बस काढू नका अस स्थानिक गावक-यांनी बस ड्रायव्हरला सूचित केले होते. मात्र ड्रायवर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्याने गाडी पाण्याच्या प्रवाहात टाकली असेही सांगितले जात आहे.

दोघांना वाचविण्यात यश : जिल्हाधिकारी
बसध्ये अडकलेल्या सहा जणांपैकी दोघांना वाचवण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे. एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा मृतदेह काढण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहे. रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहचले आहे. क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसामुळे अडचणी येत असल्याची माहिती यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 16 =

Close