एसटी कर्मचार्‍य‍ांच्या संपावरुन परिवहनमंत्री अनिल परब यांनी साधला विरोधकांवर निशाना

Read Time:2 Minute, 2 Second

एसटी कर्मचार्‍यांचा संप दिवसेंदिवस चिघळत आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक कर्मचार्‍यांवर महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. राज्यातील काही आगारांमध्ये विचित्र दृष्य बघायला मिळते आहे. चक्क खाजगी वाहनांना एसटी आगारातुन वाहतुक करु दिली जातेय हे कर्मचार्‍यांसाठी आणखी चीड आणण्यासारखे आहे.

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज पुन्हा एकदा एसटी कर्मचार्‍यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. एक-दोन दिवसात ऐवढ्या तत्काळ विलीनीकरणाची प्रक्रिया होणे अशक्य आहे. वेतनवाढीची मागणि वगळता ईतर मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सरकार कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निर्णय घेते आहे. मी चर्चेसाठी तयात आहे. मात्र एसटी कर्मचार्‍यांचा राजकीय बळी दिला जाऊ नये अशी माझी ईच्छा आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला पाठिंबा जाहीर करत भाजपने आता यावर आक्रमक भूमिके घेतली आहे. भाजपाचे आ. गोपीचंद पडळकर आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी मुंबईत एसटी कर्नचार्‍यांची भेत घेतली आहे.

एसटी कर्नचार्‍यांना चिथावण्याचा प्रयत्न भाजप करते आहे. संप अजुन चिघळावा अशीच भाजपची ईच्छा आहे. मात्र एसटी कर्मचारी राजकीय बळी ठरु नये, तसे झाल्यास ही फार दुर्दैवी बाब ठरेल असे परब म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा यावर राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 4 =