
एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
एसटी कर्मचार्यांचा बेमुदत संप दिवेंदिवस राज्य सरकारसमोरील समस्या वाढवणारा ठरतो आहे. नुकतेच राज्यातील ३७६ एसटी कर्मचार्यांवर निलंबनाची कारावई करण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळत आहे. अशावेळी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंनी स्वत: समोर येऊन एसटी कर्मचार्यांना शांततेत मात्ग काढण्याचे आवाहन केले आहे. सोबतच विरोधकांवर टीकासुद्धा केलीय.
एसटी कर्मचार्यांना चिथावुन त्यांना आंदोलनास भाग पाडून, कर्मचार्यांच्या संसाराच्या होळ्यांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजु नका असा ईशाराच ऊद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून मोठ्याप्रमाणात एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनास पाठिंबा मिळतांना दिसत आहे.
मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंनी एसटी कर्मचार्यांना आवाहनसुद्धा केले आहे. एसटी कर्मचार्यांनो तुम्ही सर्व आमचेच आहात, तुमच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ऊच्च न्यायलयाच्या देखरेखीखाली समिती नेमुण तुमच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल असे ऊद्धव ठाकरे म्हणालेत.
राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेस वेठीस धरुन आंदोलन करु नका, आतासुद्धा आपण कोरोनासोबतची लढाई लढतो आहे. त्यामुळे आपले प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरुन आंदोलन करु नका अशी हात जोडुन विनंती करतो असेसुद्धा ऊद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.