एसटी कर्मचारी आक्रमक

Read Time:2 Minute, 16 Second

मुंबई/धुळे : राज्यात एसटी कर्मचारी संपावर ठाम असून, जोपर्यंत एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे, दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानात कर्मचा-यांची संख्या वाढत असून, सरकारविरोधात कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

त्यातच परिवहन मंत्रालयाने कर्मचा-यांना अल्टिमेटम दिल्याने काही कर्मचारी कामावर रुजू होऊन बससेवा सुरू करीत आहेत. मात्र, आता बसवर दगडफेकीचे प्रकार होत आहेत. धुळ््यात रविवारी अज्ञातांनी ४ बसवर दगडफेक केली. यात एक चालक जखमी झाला.
एसटी बस कर्मचा-यांच्या संपाला झुगारून धुळे बस आगारातून आज बस सेवा सुरू करण्यात आली.

सरळ भरतीत निवडलेल्या चालकांच्या माध्यमातून या बस धुळे आगारातून नरडाणा, धनूर अशा ठिकाणी पाठवल्या गेल्या. पोलिस बंदोबस्त असतानाही ४ बसेसवर दगडफेक झाली. या चारही बस वेगवेगळ््या मार्गावर पाठवण्यात आल्या होत्या. दगडफेकीच्या घटनांमुळे नव्याने सेवेत दाखल झालेल्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

धुळ््यातील दगडफेकीच्या घटनेत विजय भामरे हे बस चालक जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेवर चिंता व्यक्त करताना अधिक सुरक्षा पुरवण्याची मागणी चालकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने आगार प्रमुखांना बस सोडण्याचे मार्ग आधी कळवण्यासंदर्भात सूचना केली आहे. मात्र दगडफेकीच्या या घटनेमुळे आता सुरू झालेली बस सेवा ही पुन्हा बंद होईल, अशी स्थिती दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 9 =