
एसटीला सव्वाशे कोटींचा फटका
संप मागे घ्यावा, एसटी महामंडळाने केले आवाहन, ३६ बस धावल्या
मुंबई : एसटी कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. मात्र, परिवहनमंत्री अनिल परब यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच एसटी महामंडळानेदेखील आज प्रथमच कर्मचाºयांनी संप मागे घ्यावा, असे म्हटले आहे. कोरोनाचे संकट आणि एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे आतापर्यंत तब्बल सव्वाशे कोटींचा फटका बसला आहे. कर्मचाºयांची मागणी उच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे. न्यायालयाने यासंदर्भात समितीही स्थापन केली आहे. त्यामुळे आता संप करण्यात अर्थ नाही, असेही महामंडळाचे म्हणणे आहे. दरम्यान, ३६ बस पोलिस संरक्षणात सुरू झाल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्नी यांनी सांगितले.
संप सुरू असला तरी बरेच कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत. त्या कर्मचाºयांना कामावर येण्याचे मी आवाहन करतो. त्यांना मदत करण्यात येईल. मॅकेनिकल स्टाफ कामावर येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ज्या कर्मचाºयांची संपात सहभागी होण्याची इच्छा नाही, त्या कर्मचाºयांनी कामावर यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यांना प्रशासन संरक्षणदेखील देईल, असे एसटी महांडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्नी म्हणाले. सध्या ३६ बसेस पोलिस संरक्षण देऊन सुरू केल्या आहेत. संपामुळे सव्वाशे कोटी रुपयाचा लॉस महामंडळाचा झाला आहे. तसेच जे कर्मचारी निलंबित झाले नाहीत, ते कामावर येऊ शकतात. कर्मचाºयांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असेही चन्नी म्हणाले.
संप मागे घ्या, कामावर
येणाºयांना संरक्षण देऊ
भाजपचे नेते एसटी कर्मचाºयांना भडकवण्याचे उद्योग करत आहेत. सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यात पुढे आहेत. कामगारांचे नुकसान झाले तर हे कोणीही कामगारांची जबाबदारी घेणार नाहीत, असे सांगत आज पुन्हा कर्मचाºयांना कामावर येण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. जे कर्मचारी कामावर येतील, त्यांना पूर्ण संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाहीही परब यांनी दिली. काही एसटी कर्मचाºयांना कामावर यायचे आहे, मात्र भाजपचे लोक येऊ देत नाहीत, असा आरोप परब यांनी केला.
दीड हजार कर्मचारी कामावर, ३६ बस धावल्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचाºयांनी कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत असून आज विविध आगारातून ३६ गाड्या धावल्या, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्नी यांनी दिली.