‘एवढा लाळघोटेपणा करणारा आमदार…; किशोरी पेडणेकर आक्रमक

Read Time:1 Minute, 42 Second


मुंबई । शिंदे गटातील आमदार रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळुन निघाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या जास्त आक्रमक झाल्या असल्याचं दिसून आलं.

ज्या रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांनी मोठं केलं. त्यांच्याच बाबतीत अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे. असं पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. अशी घाण आमच्या पक्षातून गेली हे बरं झालं, असंही त्या म्हणाल्या. त्यांनी ही प्रतिक्रीया देताना रामदास कदमांचे भाषणाचे जुने व्हिडीओ देखील दाखवले.

बाळासाहेबांनी विश्वास टाकला आणि त्यांच्या मुलाला आमदार केलं. आणि जेव्हा बाळासाहेब ऐकायचे नाहीत तेव्हा वहिनींकडे मस्का मारायला जायचे. एवढा लाळघोटेपणा करणारा आमदार गेला हे चांगलंच झालं, असं सुद्धा किशोरी पेडणेकरांनी बोलताना म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘काॅंग्रेसला बरोबर घेऊ नये…’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

‘सत्य लोकांसमोर यायला हवं…’; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली ही मोठी मागणी

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − 11 =