January 19, 2022

एलओसीवर रहस्यमय स्फोट; अधिका-यासह एक जवान शहीद

Read Time:1 Minute, 23 Second

जम्मू: जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात गस्तीवर असलेल्या लष्करी अधिका-यासह जवानाचा मृत्यू झाला. यावेळी झालेल्या स्फोटाचे कारण कळू शकले नसल्याने या घटनेचे गुढ उकलल्या जात नव्हते. लष्कराने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार भारतीय सैन्याचे जवान नौशेरा सेक्टर येथील सीमारेषेवर गस्त घालत असताना ही घटना घडली आहे. या घटनेचे कारण समजू शकले नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले होते.

सीमेपलिकडून येणा-या दहशतवाद्यांच्या हालचालींवना आळा घालण्यासाठी सैन्याकडून भुसुरूंग पेरले जातात. लष्कराचे हे जवान सीमेवर गस्त घालत असताना त्यावर पाय पडल्याने मृत्यू झाला असल्याची शक्यता लष्कराकडून वर्तवण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी सीमेवर भूसुरुंग लावणे हा एक सराव असल्याचेही लष्कराकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × three =

Close