July 1, 2022

एन्काऊंटर ची धमकी देणारे पो. नि. अशोक घोरबांड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण.

Read Time:4 Minute, 52 Second

नांदेड –  माझ्या नातेवाईकांवर केस करतोस का केस गुमान मागे घे अन्यथा तुझे एन्काऊंटर करीन अशी उघड धमकी देणारे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी शहरापासून लगतच असलेल्या मौजे वडगाव येथील बौद्ध समाजाचे पीडित फिर्यादी नागोराव धुताडे यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक १८ मे बुधवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

नांदेड शहरालगत असलेल्या व नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौजे वडगाव येथील बौद्ध समाजाचे नागोराव धुताडे यांच्या शेतात असलेल्या झोपडी व कडबा गावातीलच शेषराव घोरबांड व इतर दहा जणांनी जाळल्याची घटना दिनांक २९एप्रिल २०२१ रोजी घडली होती. झोपडी व घर जाळण्याबरोबरच सदर फिर्यादी सही मारण्याची धमकी देण्यात आली होती या घटनेची फिर्याद दिनांक 30 एप्रिल रोजी पीडित नागोराव धुताडे यांनी फिर्याद दिली.

धुताडे यांच्या शेतात अतिक्रमण करण्याचे उद्देशाने गावातीलच शेषराव घोरबांड व इतरांनी न्यायालयात सदर प्रकरणी केस सुरू असताना वरील लोकांनी धुताडे यांची झोपडी व कडबा जाळला व  जिवंत जाळण्याची धमकीही दिली. दुधाडे यांनी गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करूनही योग्य ती कायदेशीर कार्यवाही होत नसल्याने व नांदेड ग्रामीणचे  निरीक्षक अशोक घोरबांड यांचे नातेवाईक घोरबांड कंपनी असल्यामुळे सदर केस मागे घे अन्यथा तुला कपडे काढून तुझे एन्काऊंटर करीन अशी धमकी दिली अशी माहिती यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली. नांदेड जिल्ह्यात पोलिस दलातील उच्च पदावर आसनस्थ होण्याची मनीषा बाळगणारे नांदेड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून नवी ओळख निर्माण करू पहात असून त्यांच्या कार्यशैलीने गरीब व मागास समूहाच्या  फिर्यादीना न्याय मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी वाढत आहेत. वडगाव येथील प्रकरणात नागोराव धुताडे यांना केस मागे घे नसता तुझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करीन व तुझे एन्काऊंटर करीन अशी धमकी देणारे घोरबांड यांच्यावर कारवाई सह  झोपडी व कडबा जाळून नुकसान केल्याप्रकरणी महसूल विभागाने योग्य ती कार्यवाही करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करून पीडित दुधाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी बळाचा वापर करून माझे उपोषण दाबण्याचा प्रयत्न केला तरीही न्याय मिळेपर्यंत माझे आमरण उपोषण सुरू राहील असा निर्धार धुताडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

त्याबरोबरच वाजेगाव जवळील शिवशंकर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या वसाहतीतील रहिवासी सुरेश गोमसाळे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या कार्यशैली बाबत जाहीर पाढा वाचला असून त्यांना नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकातून तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × 5 =

Close