एटीएम कार्ड बदलून 97 हजार 700 रुपये परस्पर काढले – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या बॅंक खात्यातून 97 हजार 700 रुपये काढून घेतल्याचा फसवणूकीचा प्रकार घडला आहे.
विश्र्वंभर मारोतीराव कुरूळेकर (56) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे बॅंक खाते एसबीआय शाखा कंधार या वरून दि.20 ते 24 एप्रिल दरम्यान वेगवेगळे रोख रक्कमेचे परस्पर वळण करण्यात आले. हा प्रकार त्यांचे एटीएम कार्ड बदलून कोणी तरी केला आहे. एटीएमवर घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असेल. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 प्रमाणे गुन्हा क्रमांक 167/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कव्हाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.


Post Views: 157


Share this article:
Previous Post: वजिराबाद गुन्हे शोध पथकाने एका अल्पवयीन बालकाकडून चोरीच्या दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या

May 18, 2024 - In Uncategorized

Next Post: अंदाजे 19 लाख रुपये भरलेले एटीएम मशीन चोरट्याने चोरले 

May 19, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.