एटीएमची तोडफोड करून ३ लाख २८ हजारांची रक्कम लंपास

Read Time:1 Minute, 18 Second

उस्मानाबाद : एटीएम मशिन ठेवलेल्या खोलीचे शटर व सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड करून अज्ञात व्यक्तींनी तब्बल ३ लाख २८ हजार ६०० रूपयांची रक्कम पळविली. ही घटना १९ ते २० जुलै दरम्यान घडली.

उमरगा तालुक्यातील दाळिंब येथील हिराजी श्रीमंत गायकवाड यांच्या जागेत भाडेतत्वावर घेतलेल्या इंडिया १ कंपनीचे एटीएम आहे. सदर एटीएमच्या खोलीचे शटर व सीसीटीव्ही कॅमेराची अज्ञात चोरट्यांनी १९ ते २० जुलै रोजी तोडफोड केली. तसेच आतील एटीएम मशिनमधून तब्बल ३ लाख २८ हजार ६०० रूपयांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी बापूसाहेब पाटील (झोनल ऑपरेशन मॅनेजर, रा. लातूर) यांनी २० जुलै रोजी मुरूम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंसं कलम ४६१, ३८०, ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × five =