
एकूण १०३ गावे पुराने बाधित
सांगली: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासोबत चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील एकूण १०३ गावे पुराने बाधित झाली आहेत. ४१ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. पूरस्थिती पाहता दोन लाख जणांना स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषेदत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. ‘केंद्र सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी, राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी तसूभरही कमी पडणार नाही.’, असे त्यांनी स्पष्ट केले़राष्ट्रवादी आमदार आणि खासदारांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्त भागाला देण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले़
‘अद्यापपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. नुकसानीचे आकडे निश्चितपणे बदलणार आहेत. जसे जसं पाणी कमी होतेय. तस तसं शेती पूर्ण वाहून गेली आणि किती नुकसान झाले याची आकडेवारी येत आहेत. त्यामुळे अधिकाºयांना पंचनामे सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारनेही राज्याला चांगले सहकार्य केले. राज्य सरकारचा केंद्र सरकारशी चांगला समन्वय आहे. आर्थिक बाबतही किती भार येईल याबाबतही त्यांच्याशी बोलू. राज्य सरकारही तिथे मागे राहणार नाही.’असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. राज्यातील पूरव्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़ सांगली शहरातील पूरबाधित स्टेशन चौक परिसराला भेट दिली. स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून शहराला वारंवार उद्भवणारÞ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा केली.सोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. रस्ते आणि पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे. जिल्ह्यात २४ ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे एनडीआरएफची दोन पथकं कार्यरत आहेत.
जनतेचे ऐकून घ्यायचे असते;
आ. भास्कर जाधव यांना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चिपळूण आणि खेडमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. चिपळूण बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही महिलेचे म्हणणे ऐकून धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आरेरावी केल्याचा प्रकार त्यावेळी घडला. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना टोला हाणला आहे. ‘आम्ही कुठेही गेलो तर जनता काही सांगत असते. त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं. तिथली परिस्थिती नेमकी काय झालेली आहे. हे मला माहिती नाही. त्यांनी असंही स्टेटमेंट केलं आहे की, ते त्यांच्या घरातील नातेवाईक होते. लोकप्रतिनिधी खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री कुठेही गेले तर जनतेचं म्हणणं ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे. ते पार पाडलं पाहीजे.’’, असं अजित पवार यांनी सांगितले.