एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका; दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला अखेर परवानगी मिळाली

Read Time:1 Minute, 48 Second


मुंबई | दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला आहे. एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका बसलाय. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला अखेर परवानगी मिळाली आहे.

कोर्टाने महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. खरी शिवसेना कोणती यात आम्हाला पडायचं नाही, असंही कोर्टाने म्हटलं. तसेच शिवसेनेला यापूर्वी दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली होती, असं सांगतानाच दोन्ही गटाचे अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्यच होता, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

आम्ही शिवाजी पार्कच्या जागेची आधीच मागणी केलीय. शिवाजी पार्क मैदानासाठी सर्वात आधी कुणी अर्ज केला? असा सवाल कोर्टाने केला. त्यावर आम्हीच पहिल्याादा अर्ज केला.

22 आणि 26 ऑगस्ट रोजी आम्ही अर्ज केला होता. 30 ऑगस्ट रोजी शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी अर्ज केला होता, असं शिवसेनेच्या वकिलाने सांगितलं. तसेच शिंदे गटाची याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्री शिंदे पण कारभार करतायत फडणवीस आणि खुर्चीवर बसलाय मुलगा”

अण्णा हजारे आक्रमक; शिंदे सरकारला दिला ‘हा’ गंभीर इशारा

Leave a Reply

Your email address will not be published.

7 + 11 =