एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीतून उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाले…

Read Time:1 Minute, 54 Second

मुंबई | शिवसेनेच्या देशातील 13 राज्यांमधील राज्यप्रमुखांची सभा बुधवारी दिल्लीत आयोजित केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड शब्दात उत्तरे दिली.

आम्हाला अभिमान आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? शिवसैनिकांकडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात येत आहे. शिवसैनिकांवर विश्वास नाही, असं ते म्हणालेत.

खोके सरकार म्हणणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. मी सांगायला सुरूवात केली, तर तुम्ही कुठे राहणार आहे. पब्लिक है सब जानती है, असं म्हणत त्यांनी ठाकरे कुटुंबियांवर हल्ला चढवला.

वृद्धांना मदत करण्याचे कंत्राट घेतलं आहे. यासाठी मला कुणी कंत्राटदार म्हणत असतील तर ते माझ्यासाठी भूषणावह आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केलीये.

दरम्यान, तुम्ही आम्हाला जमीन दाखविण्याची भाषा करीत आहात, आम्ही तुम्हाला आसमान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी दिलंय. तसेच यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published.

16 + three =