“एकनाथ शिंदेंचं नाव बदला आणि श्रीमान खापरफोडे करा”

Read Time:2 Minute, 0 Second


मुंबई | शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटल्याने शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) धारेवर धरलं.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेला त्यामागे तत्कालिन महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केला होता. शिंदेंच्या या आरोपालाही सामनातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

शिंदे गटाच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीने महाराष्ट्राशी उभा दावा मांडला. शिंदे मात्र सर्व खापर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडून स्वतःचे अपयश झाकत आहेत. शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे असेच ठेवायला हवे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

दरम्यान, तुम्हाला हवे ते मिळाले पण महाराष्ट्रातील रोजगार मात्र तुमच्या त्या बकासुरी महाशक्तीने ओरबाडून नेला. त्याचे खापर आधीच्या सरकारवर फोडून तुम्ही तुमच्या अकलेची दिवाळखोरी जाहीर केली आहे, अशी टीका देखील शिवसेनेने सामनातून केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“राहुल गांधी की यात्रा में दम नहीं और इस यात्रा से हमें कोई गम नहीं”

काळजी घ्या! पुढचे 3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Leave a Reply

Your email address will not be published.

16 − 14 =