ऍटोत विसरलेली पर्स चालकाने प्रवासाकडे सुपूर्द


नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अनेकदा ऍटोत प्रवास करत असतांना प्रवाशांच्या अनेक मौल्यवान वस्तुसह काही रोख रक्कमही हरवल्याच्या घटना घडल्या आहेत आणि काही ऍटो चालकांनी प्रमाणिकपणा दाखवत. आपल्या ऍटोत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जशास तशाच परत केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आणि 1 लाख 80 हजार रुपयांची पर्स ऍटो चालकाने परत केली.
नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस अधिक्षक कार्यालयापासून ते चैतन्यनगर असा प्रवास करण्यासाठी एक महिला पोलीस कर्मचारी रुकसाना शेख एम.एच.26 बी.डी.6491 या ऍटोत बसल्या. त्यांच्यासोबत मौल्यवान असलेली पर्स सोबत होती. त्या पर्संमध्ये सोन्याचे दागिणे, मोबाईल आणि काही रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपये किंमतीची पर्स सोबत होती. ही पर्स ऍटोमध्ये विसरली. हे रुकसाना शेख यांच्या ऍटोमधून उतरल्यानंतर लक्षात आली. पण त्यावेळी तो ऍटो त्या ठिकाणी नव्हता. ऍटोमध्ये कोण्या तरी प्रवाशाची पर्स ऍटोत राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या टायरगर संघटनेच्या अध्यक्षाला फोन केला. पण त्या अध्यक्षांनी प्रतिसाद न दिल्यामुळे स्वत: रिक्षा चालकच महिला प्रवाशांच्या शोध निघाला आणि तेवढ्या ती महिला त्या ऍटो चालकाला दिसली. त्यानंतर त्या ऍटो चालकाने पोलीस कर्मचारी असणाऱ्या रुकसाना शेख या महिलेला विचारपुस केली असता त्या महिलेने माझी पर्स ऍटोमध्ये विसरली असल्याचे सांगितले आणि चालकाने आपला प्रामाणिकपणा दाखवत ती पर्स त्या महिलेच्या स्वाधीन केली. चालकाच्या या प्रमाणिक पणाचे कौतुक सर्वत्र होतांना पाहावयास मिळत आहे.


Share this article:
Previous Post: अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने 37 वर्षीय व्यक्तीचा खून केला

June 17, 2024 - In Uncategorized

Next Post: पोलीस भरतीमध्ये शॉर्टकट कोणी सांगितला तर ऐकू नका-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

June 17, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.