January 19, 2022

उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण

Read Time:1 Minute, 8 Second

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात दिसतेय. मात्र, आता अभिनेत्री आणि शिवसेना नेता उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत:ला विलगणीकरणामध्ये ठेवले असून संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी, असे उर्मिला यांनी ट्विट करून सांगितले आहे. माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी ठिक आहे.

सध्या मी विलगीकरणात असून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करावी. तसेच दिवाळीच्या सणामध्ये सर्वांनी काळजी घ्यावी, असे उर्मिला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ते देखील विलगीकरणात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven − 5 =

Close