उर्फी प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकरांनी उचललं मोठं पाऊल

Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 49 Second


मुंबई | तोकड्या कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फी जावेदविरोधात भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आक्रमक झाल्या आहेत.

Advertisements

चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांनी याप्रकरणी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावर निशाणा साधला. आता यावरून वाद आणखी वाढलाय आहे.

चित्रा वाघ यांनी  उर्फी विरोधात तक्रार दाखल केली तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उर्फी प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. यावरून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात चांगली जुंपली. यानंतर आता राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

उर्फी जावेदला पत्र देत नाही. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आयोग करत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. पण स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आणि आकसापोटी आय़ोगावर जी भूमिका घेतलीय या प्रकरणी आम्ही चित्रा वाघ यांना नोटीस पाठवतोय. मेलद्वारे ही नोटीसही पाठवली असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *